September 5, 2024 12:58 PM

राज्याला केंद्रिय कृषी मंत्रालयाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार

केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. तसंच 2022-23 या वर्षासाठी राज्याला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीत झालेल्या समारंभात केंद्रिय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जावर वार्षिक 3 टक्के सवलत दिली जाते. या योजनेसाठी राज्यात गेल्या ऑगस्ट महिन्यापर्यंत विविध बँकांनी 8 हजार 353...

September 3, 2024 9:44 AM

कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आज कृषी निवेश पोर्टलचा प्रारंभ करणार

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज नवी दिल्लीत अ‍ॅग्रीशुअर फंड आणि कृषीनिवेश पोर्टलचा प्रारंभ करणार आहेत. याशिवाय विविध विभागात कृषी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँका आणि राज्यांच्या प्रयत्नांचं कौतुक म्हणून दिल्या जाणाऱ्या कृषी पायाभूत निधी अर्थात एआयएफ उत्कृष्टता पुरस्कारांचं वितरणही कृषीमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. राज्यांचे मंत्री तसंच विविध राज्याचे आणि बँकाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारांमुळे बँकांना त्यांची कामगिरी आणखी सुधारण्यास आणि...