September 16, 2024 7:59 PM

तालिबान प्रशासनानं अफगाणिस्तानमधल्या सर्व पोलिओ लसीकरण मोहीम थांबवल्या

तालिबान प्रशासनानं अफगाणिस्तानमधल्या सगळ्या पोलिओ लसीकरण मोहीमा थांबवल्या असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं घोषित केलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनं राबवली जाणार असलेली या महिन्यातली  नियोजित पोलिओ लसीकरण मोहीम रद्द केली असल्याचं तालिबाननं ही मोहीम सुरु होण्याच्या बेतात असतानाच राष्ट्रसंघाला  कळवलं आहे. ही मोहीम खंडित करण्याचं कारण मात्र तालिबाननं स्पष्ट केलेलं नाही.    अफगाणिस्तानमधल्या पोलिओ बाधितांची संख्या गेल्या तीन वर्षात आणखी वाढली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दोनच देश अर्धांग...

September 12, 2024 1:04 PM

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड कसोटी सामन्याचा सलग चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यानच्या एकमेव क्रिकेट कसोटी सामन्याचा आजचा सलग चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द करावा  लागला. उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा इथल्या शहीद विजय सिंह पथिक स्टेडियममध्ये आयोजित हा सामना एकही चेंडू टाकल्याविनाच रद्द होण्याची शक्यता असून उद्या सकाळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं सामनाधिकारी जवगल श्रीनाथ यांनी सांगितलं. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळातर्फे होणाऱ्या सामन्यांसाठी ग्रेटर नोएडातलं हे मैदान वापरलं जातं.

June 14, 2024 2:39 PM

टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानकडून पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव

टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सकाळी त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव केला. पापुआ न्यू गिनीनं दिलेलं ९७ धावाचं आव्हानं अफगाणिस्ताननं तीन गडी गमावून पूर्ण केलं. काल झालेल्या सामन्यात इंग्लडनं ओमानला ८ गडी राखून हरवलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ओमान संघाला इंग्लडनं केवळ ४७ धावांमध्येच गुंडाळलं. विजयासाठीचं ४८ धावांच माफक आव्हान इंग्लडनं केवळ ३ षटकात दोन गडयांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.