August 25, 2024 3:28 PM

लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार – मंत्री अदिती तटकरे

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ जुलै नंतर आलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून पात्र महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. अर्जांची प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू असून प्रशासकीय मान्यतेनंतर पात्र महिलांची माहिती विभागाकडं येते. त्यानंतर ही यादी बँकेकडे पाठवली जाते असं त्या म्हणाल्या.   आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले. तर ४२ हज...

August 15, 2024 7:04 PM

लाडकी बहीण योजनेच्या ८० लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचे पैसे जमा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून  आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज दिली. १४ ऑगस्टपर्यत १ कोटी ६२ लाखापेक्षा अधिक महिलांनी नोंदणी  झाली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आतापर्यंत लाभार्थींच्या बँक खात्यात २ महिन्यांच्या लाभाची रक्कम एकूण ३ हजार रुपये जमा करण्यात आली

July 11, 2024 7:20 PM

अंगणवाडी उभारणी, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात प्रस्ताव – मंत्री आदिती तटकरे

राज्यात अंगणवाडी उभारणी, दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याबाबतचा प्रश्न मोनिका राजळे यांनी उपस्थित केला होता. राज्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जिल्हा परिषद निधी, जिल्हा नियोजन समितीच्या निधीद्वारे दुरुस्ती, नवीन बांधकामं केली जातात असं तटकरे यांनी सांगितलं.   ऑटोरिक्षा, टेम्पो आदी वाहनांच्या परवाना नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास पन्नास रुपये...