August 25, 2024 3:47 PM

नागपूर-अमरावती महामार्गावर शिवशाही बसला झालेल्या अपघातात २ ठार, २४ जखमी

नागपूर - अमरावती महामार्गावर नांदगावपेठ जवळ राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात दोन प्रवासी ठार तर २४ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. नागपूरहून अकोल्याला जाणाऱ्या बससमोर अचानक आडव्या आलेल्या गायीला वाचवताना नियंत्रण सुटल्यानं ही बस उलटून हा अपघात झाला.

August 24, 2024 10:18 AM

नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या अपघातात २७ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील 24 जणांचा समावेश आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतदेह तातडीनं महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. हे सर्व मृतदेह वायुसेनेच्या विमानानं आज नाशिक इथं आणण्यात येतील; त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहेत.

August 19, 2024 10:19 AM

राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू

सिन्नरहून मुंबईकडे दूध घेऊन निघालेला दुधाचा टँकर काल दुपारी कसारा घाटातील दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला; तर चौघे जखमी झाले आहेत. टँकर भरधाव वेगात कसारा घाट उतरत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि लोखंडी संरक्षक कठड्याच्या जाळ्या तोडून अंदाजे 250 फूट खोल दरीत तो कोसळला. रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या सावित्री नदीपात्रात बुडून काल तीन जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकानं तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. सावित्री नदी पलीकडे असलेल्या दर्ग्यात दर्शनासाठी जात असताना एकाचा पाय घसरू...

August 15, 2024 6:46 PM

वाशिम – समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तीन जखमी

वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमधे सात वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. अपघातग्रस्त गाडी नागपूरहून मुंबईला जात असताना वाशिम जिल्ह्यात हा अपघात झाला. जखमींना अमरावती इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

July 23, 2024 8:08 PM

मेळघाटात मध्य प्रदेशाच्या सीमेवर झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू

मेळघाटात मध्य प्रदेशाच्या सीमेवर मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यु झाला, तर ११ जण गंभीर झाले. मध्य प्रदेशातल्या खालवा तालुक्यात रोशनी चौकी इथं हा अपघात झाला. भर पावसात स्थानिक प्रशासनानं मदत कार्य सुरु केलं आहे.

July 19, 2024 9:37 AM

जालना जिल्ह्यात भाविकांच्या गाडीला अपघात

जालना जिल्ह्यात प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप रस्त्यालगतच्या विहिरीत पडून सात जणांचा मृत्यू झाला. बदनापूर तालुक्यातल्या चनेगाव इथले काही भाविक पंढरपूर वारीकरून जालना इथं परतत असतांना, काल संध्याकाळी जालना-राजूर मार्गावर तुपेवाडी फाट्याजवळ खडेश्वर बाबा मंदिर परिसरात या जीपची एका दुचाकीशी धडक झाली, त्यानंतर ही जीप रस्त्यालगतच्या विहिरीत पडून हा अपघात झालामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून या अपघाताची माहिती घेतली. मयत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना ...

July 15, 2024 2:46 PM

गुजरातमध्ये अहमदाबाद-बडोदा द्रुतगती मार्गावरील अपघातात ६ जणांचा मृत्यू

गुजरातमधल्या अहमदाबाद बडोदा द्रुतगती मार्गावर आज सकाळी आनंद जवळ झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. आज पहाटे चिकोरी गावाजवळ एका बसचा टायर फुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याचवेळी आलेल्या भरधाव ट्रकने या बसला धडक दिली. या अपघातात बसचा चालक आणि इतर पाचजण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

July 10, 2024 3:18 PM

उत्तरप्रदेश : उन्नाव जिल्ह्यात झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू, १९ जखमी

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या दुधाच्या टँकरला डबल डेकर बसनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना  व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं. मृतांच्या नातेव...