September 19, 2024 1:21 PM

45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघांची आघाडी

४५ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने चीनला काल खुल्या सत्राल्या सातव्या फेरीत पराभूत केलं. डी गुकेश याने वेई यी याला हरवत भारताचा सातव्या फेरीतला  विजय निश्चित केला.    चीनवर विजय मिळवल्यानंतर खुल्या सत्रात भारताच्या खात्यात १४ गुण जमा झाले आहेत. खुल्या आणि महिला गटात भारताच्या दोन्ही संघांनी बुद्धीबळ ऑलिम्पियाडच्या उत्तरार्धात एकही सामना न गमावता प्रवेश मिळवला आहे.

September 15, 2024 3:02 PM

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटात भारताचा विजय

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या चौथ्या फेरीत भारतीय संघाने खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटात विजय मिळवला. खुल्या गटात भारतानं सर्बियाचा पराभव केला, तर महिला संघानं फ्रान्सवर विजय मिळवला. आज पाचव्या फेरीत महिला संघाचा सामना कझाकिस्तानशी तर खुल्या गटात अझरबैजानसोबत लढत होणार आहे