September 25, 2024 9:20 AM

राज्याच्या विविध भागात उद्यापर्यंत अतिवृष्टिचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्यापर्यंत जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार ते अतिवृष्टिचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भुईबावडा घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली. दरड हटवली असली तरी काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्यानं अवजड वाहनांसाठी हा घाट बंद ठेवण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात कालही पावसानं जोरदार हजेरी लावली. जाफ्राबाद तालुक्यात ...

July 13, 2024 3:14 PM

पुढील ३ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, रायलसीमा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पुढील ३ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, रायलसीमा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं उद्यापर्यंत आसाम, मेघालय, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेशात तर राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, नागालँड आणि मणिपूरच्या काही भागात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आंध्र प्रदेश किनीरपट्टी, तेलंगणा, मराठव...

July 6, 2024 7:39 PM

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल मुसळधार पाऊस

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर याच कालावधीत सोसाट्याचा वारा वाहू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर बऱ्याच ठिकाणी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

June 23, 2024 11:22 AM

कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी आणि जोराचे वारे वाहण्याचा अंदाज आहे तसंच विदर्भातही जोराच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पिवळा बावटा तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला नारिंगी बावटा जारी करण्यात आला आहे.

June 22, 2024 10:32 AM

केरळ, कर्नाटक,कोकण आणि गोव्यामध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज

केरळ, कर्नाटकाचा दक्षिण मध्य आणि किनारी भाग, कोकण आणि गोव्यामध्ये पुढील पांच दिवस मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात विदर्भाच्या उर्वरित भागात, मध्य प्रदेशच्या काही भागात, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील गंगेच्या खोऱ्यात पुढे सरकेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  

June 20, 2024 2:46 PM

पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची आणि धुळीचं वादळ येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. लोनीच्या ग्रामीण भागात, वायुदलाचा हिंडन तळ, बहादुरगड, गाजियाबाद, इंदिरापुरम या भागात पावसाची शक्यता असून हरियाणाच्या वल्लभगढ, सोनीपत, खरखोडा, मत्तलहेल तर उत्तर प्रदेशातल्या बागपत, मेरठ, सिंकदराबाद, बुलंद शहर मध्ये मध्यम पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्याही अनेक भागात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून पालघर मध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे....