August 26, 2024 7:55 PM

येत्या दोन दिवसात, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता

येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात, कोकणात किनारपट्टीवर वारे वाहण्याची तसंच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

August 24, 2024 4:01 PM

गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम इथं उद्या अतिवृष्टी होण्याचा इशारा

गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम इथं उद्या अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि पूर्व राजस्थानात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. तर उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि बिहार इथं आठवड्याभरात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे.

August 19, 2024 7:48 PM

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता -हवामान विभाग

गेल्या चोवीस तासात, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.  येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पड्ण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

June 17, 2024 1:40 PM

२२ जूननंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

पुण्यासह राज्याच्या विविध भागातून नाहीसा झालेला मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून प्रामुख्यानं घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जूनच्या पहिल्या ८ दिवसात चांगल्या पद्धतीनं बरसलेला मोसमी पाऊस गेल्या आठवडाभरापासून नाहीसा झाला आहे. त्यामुळं शेतीची कामं देखील खोळंबलेली आहेत. राज्यातील अनेक मोठ्या धरणांनी तळ गाठला असून कोयना धरणातील वीज निर्मिती देखील बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागानं...

June 13, 2024 7:52 PM

राज्यात मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती

नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या तीन चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.    येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.   गेल्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला.