July 29, 2024 4:58 PM

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पुढे सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात नोकऱ्यांची कमतरता नसून सरकारच्या विविध धोरणात्मक पावलांमुळे देशातला बेरोजगारीचा दर ३ पूर्णांक २ दशांश टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं प्रतिपादन कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत केलं. प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते. येत्या...

July 22, 2024 9:40 AM

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेतली. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असून संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं ही सरकार आणि विरोधक दोघांची जबाबदारी असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना म्हटलं.   अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन राम मेघवाल, जे...

July 2, 2024 7:59 PM

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभार प्रस्ताव लोकसभेत मंजूर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेचं कामकाज आज संस्थगित झालं. २४ जूनला सुरु झालेलं हे कामकाज उद्या संपणार होतं. मात्र आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केली.