August 27, 2024 8:05 PM

रशिया-युक्रेन संघर्षावर प्रधानमंत्र्यांचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी रशिया-युक्रेन संघर्षावर आज दूरध्वनीद्वारे संवाद साधला. धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याविषयी चर्चा केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे सांगितलं. नुकत्याच झालेल्या युक्रेन भेटीतल्या अनुभवाविषयीही पुतीन यांच्याशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. संघर्षावर लवकरात लवकर आणि शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चारही मोदी यांनी केला.

July 9, 2024 7:52 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज रशियातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द अपॉस्टल या नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हा सन्मान प्रधानमंत्री मोदी यांना दिला. रशिया आणि भारत देशांतील विशेषाधिकार धोरणात्मक भागिदारी विकसीत करण्यासाठी आणि उभय देशांतील मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आला. रशियाचे पहिले प्रेषित सेंट अँड्र्यूज यांच्या सन्मानार्थ झा...