September 24, 2024 8:21 PM

रांचीमधे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, तसंच निवडणुक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ एस. एस. संधू यांनी आज रांचीमधे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीत धनशक्तीचा वापर खपवून घेतला जाणार नाही,असं निवडणुक आयोगानं यावेळी राज्यातल्या तसंच केंद्रीय यंंत्रणांना बजावलं. आयोगानं आज राजकीय पक्ष, सुरक्षा यंत्रणा आणि इतर संबधितांच्या बैठका घेतल्या. निवडणुका प्रलोभनमुक्त व्हाव्यात, याची काळजी घेण्याचे निर्देश संबधित यंत्रणांना दिले असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी बातमीदारांना सांगितलं.  &nbsp...

August 27, 2024 8:25 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंडची अंतिम मतदार यादी जाहीर

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या राज्याची अंतिम मतदार यादी आज जाहीर झाली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही यादी तयार केली असून, अंतिम यादीनुसार २ कोटी ५७ लाख ७८ हजार १४९ मतदारांची नोंद झाली आहे. त्यापैकी १ कोटी ३० लाख ६५ हजार ४४९ पुरुष मतदार आहेत. १८ ते १९ वर्ष वयोगटातल्या मतदारांची संख्या १० लाख ७४ हजार ७३२ आहे.

August 27, 2024 8:23 PM

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तिसरी यादी जाहीर

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं तिसरी उमेदवार यादी आज जाहीर केली. यादीत २९ उमेदवारांचा समावेश असून त्यात देविंदरसिंग राणा, पवन गुप्ता, अब्दुल गनी चौधरी आणि बलदेव राज शर्मा यांना संधी मिळाली आहे.