July 9, 2024 3:41 PM

राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाला जनतेकडून देणगी स्वीकारता येणार

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून देणगी स्वीकारण्याची राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षानं केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या. 

July 4, 2024 11:32 AM

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची मतदार याद्यांची विशेष सारांश उजळणी जाहीर

महाराष्ट्रात, आगामी राज्य विधानसभा निवडणुकांच्या आधी, निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची विशेष सारांश उजळणी जाहीर केली आहे. याअंतर्गत, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रं स्थापन करण्यावर निवडणूक आयोगाचा भर राहील. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांना बूथ-स्तरीय स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात येईल. या स्वयंसेवकांना पात्र मतदारांची नावे अद्ययावत करण्याचे आणि सोसायटी सोडून गेलेल्या किंवा सोसायटीतील मृत व्यक्तींची नावे काढून टाकण्याचे काम दिले जाई...