June 20, 2024 1:38 PM
राष्ट्रपतींच्या वाढदिवसानिमित्त उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवसानिमित्त उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी भेट देत त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना समाजमाध्यमावरल्या संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींची देशाप्रती सेवा आणि त्याग आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. राष्ट्रपतींच्या वाढदिवसानिमित्त त्यांची विशेष मुलाख...