September 23, 2024 7:01 PM

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करण्याचं राज्यपालांचं आवाहन

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ मुंबई विद्यापीठात झाला. त्यावेळी ते बोलत होते.     राज्यपालांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि  व्यवस्थापन, मानवता विद्या शाखा, आंतरविद्या शाखा अशा विविध शाखांमधून १ हजार १३० पदवीधरांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदा...

August 26, 2024 7:27 PM

आदिवासी बांधवांचा सर्वांगीण आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत – राज्यपाल

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी  केलं आहे. आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव बनवणं आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणं, या विषयाबाबत आज मुंबईत राजभवनात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. ‘प्रधानमंत्री जनमन योजने’च्या राज्यातल्या अंमलबजावणीचा आढावाही त्यांनी घेतला. आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्या...

August 14, 2024 7:16 PM

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला दिल्या शुभेच्छा

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्यानं सामाजिक तसंच आर्थिक विकासात उल्लेखनीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र राज्य हे भारतातलं केवळ आघाडीचंच राज्य नसून ते प्रगती आणि नवनिर्मितीचं प्रतीकही आहे, असं राज्यपालांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. समृद्ध आणि सर्वसमावेशक विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात महाराष्ट्र निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला आहे.