August 24, 2024 2:21 PM

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टीन यांची भेट घेतली

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टीन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये संरक्षण सहकार्य, उद्योग, प्रादेशिक सुरक्षा आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, राजनाथ सिंह यांनी दोन्ही देशांदरम्यानच्या विकासाच्या संधींवर भर दिला. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या S.O.S.A अर्थात सुरक्षा पुरवठा व्यवस्थेबद्दल लॉईड आणि राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं.

August 24, 2024 11:14 AM

भारत – अमेरिका दरम्यान महत्त्वाचा संरक्षण करार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.  संरक्षण मंत्र्यांच्या या भेटीत भारत आणि अमेरिकेत पुरवठा सुरक्षा व्यवस्था करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारातून परस्परांना संरक्षण सामग्री पुरवठ्यात प्राधान्य देण्याचं मान्य झालं.    अमेरिकेबरोबर असा करार करणारा भारत हा अठरावा देश आहे.  दोन्ही देशांमध्ये संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.  सध्या आणि भावी काळातल्या संरक्षण विषयक सहयोगासंदर्भात राजनाथ सिंह अमेरिकन संरक्षण उद्योगाबरोबर...