July 9, 2024 7:52 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज रशियातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द अपॉस्टल या नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हा सन्मान प्रधानमंत्री मोदी यांना दिला. रशिया आणि भारत देशांतील विशेषाधिकार धोरणात्मक भागिदारी विकसीत करण्यासाठी आणि उभय देशांतील मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आला. रशियाचे पहिले प्रेषित सेंट अँड्र्यूज यांच्या सन्मानार्थ झा...

July 9, 2024 7:01 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

आगामी काळात भारत- रशिया संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. भारत - रशिया शिखर परिषदेप्रसंगी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. गेली ४०-५० वर्ष भारत दहशतवादाचा सामना करत आहे, त्यामुळे मॉस्कोमधल्या दहशतवादी  हल्ल्यावेळी झालेली वेदना आपण समजू शकतो, असं त्यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद निंदनीय असल्याचं ते म्हणाले. रशियासोबतच्या सहकार्यामुळे  भारतीय शेतकरी आणि भारतीय ग्राहकांचा मोठा ...

June 22, 2024 5:59 PM

रशियाचा युक्रेनमधे पॉवर ग्रीडवर जोरदार हल्ला

युक्रेनमधे लीव शहरातल्या वीज निर्मिती आणि पारेषणाच्या पॉवर ग्रीडवर रशियाने केलेल्या जबरदस्त हल्ल्यात दोन वीज कामगार जखमी झाले. युक्रेनच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं, की रशियाने  डागलेल्या१६ क्षेपणास्त्रांपैकी १२ आणि १३ ड्रोन युक्रेनच्या हवाई दलानं निकामी केली. युक्रेनमधल्या पायाभूत सुविधांवर रशियाने गेल्या ३ महिन्यात केलेला हा आठवा हल्ला होता. 

June 18, 2024 3:14 PM

व्लादिमीर पुतिन या आठवड्यात उत्तर कोरियाला भेट देणार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या आठवड्यात उत्तर कोरियाला भेट देणार आहेत. रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातली द्विपक्षीय भागीदारी पुन्हा सुरू होण्याची शक्यता असताना पुतिन यांच्या भेटीचं नियोजन करण्यात आल्याची माहिती उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेनं दिली आहे. उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील सखोल लष्करी भागीदारी ही चिंतेची बाब असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं काल सांगितलं. व्लादिमीर पुतिन यांचा २४ वर्षांतला हा पहिलाच उत्तर कोरिया दौरा आहे.

June 17, 2024 3:07 PM

रशियाच्या विशेष कृती दलानं दहशतवाद्यांच्या ताब्यातून २ कारागृह कर्मचाऱ्यांची केली सुटका

रशियाच्या विशेष कृती दलानं दहशतवाद्यांच्या ताब्यातून २ कारागृह कर्मचाऱ्यांची सुटका केली. यावेळी रोस्टोव्ह शहरात काल झालेल्या चकमकीत इस्लामिक दहशतवादी गटाच्या सहा जणांना गोळ्या घालण्यात आल्या. हे सहा जण या कारागृहात बंदी होते. त्यांनी दोन जेल कर्मचाऱ्यांना बंदी करत त्या बदल्यात आपल्या सुटकेची मागणी केली होती. मार्च महिन्यात मॉस्कोच्या एका सभागृहावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी तसचं दहशतवादी कारवायांप्रकरणी  अटक केली होती.