September 24, 2024 7:24 PM

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पावसानं जोरदार हजेरी लावली. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात संगमेश्वरमध्ये सर्वाधिक ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी आज संध्याकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. भुईबावडा घाटात काल दरड कोसळली होती. आज संध्याकाळ पर्यंत दरड हटवून मार्ग मोकळा केला आहे. मात्र अवजड वाहनांसाठी हा घाट बंद ठेवला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली आहे. परभणी जिल्ह्यात ही विजेच्या कडकडाटासह मुसळधार प...

August 27, 2024 8:34 PM

रत्नागिरीत परिचारिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपासाकरता SIT ची स्थापना

रत्नागिरी इथं एका प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या पथकात महिला निरीक्षक, दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी असून त्यात तांत्रिक/वैज्ञानिक अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर शोधून काढण्याचे निर्देश दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

August 1, 2024 9:30 AM

रत्नागिरीत इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळेचं आयोजन

रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे काल रत्नागिरीत इग्नाइट महाराष्ट्र या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठीची राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतून गावागावात एकत्रितपणे कारखाने उभारता येतील का, या दृष्टीनं विचार करून सर्वांनी प्रयत्न करावे, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी या कार्यश...

July 3, 2024 8:28 PM

रत्नागिरीत देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ उभारायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

रत्नागिरीत देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ उभारायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी थोड्या वेळापूर्वी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रत्नागिरीत शासकीय विधी महाविद्यालय उभारायलाही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचं सामंत यांनी सांगितलं. सागरी विद्यापीठाच्या उभारणीसाठी पाचशे ते सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचा शासन आदेश निघाल्यानंतर त्यासाठी जिल्हाधिकारी ३० दिवसांत रत्नागिरी तालुक्यात ५० एकर जागा उपलब्ध ...