September 26, 2024 2:05 PM

युक्रेनला अण्वस्त्र पुरवणारा देश युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा

रशिया विरुद्धच्या युद्धात यूक्रेनला अण्वस्त्र पुरवल्यास संबंधित देशही त्या युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. मॉस्को इथं काल झालेल्या रशियाच्या सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. यूक्रेनने या युद्धात लांब पल्ल्याच्या पाश्चात्त्य क्षेपणास्त्रांचा वापर करण्यासाठी अमेरिका आणि युरोपमधल्या आपल्या मित्र राष्ट्रांकडून परवानगी मागितली आहे, असं यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

August 24, 2024 10:26 AM

युक्रेन-रशिया दरम्यानच्या संघर्षावर उभय देशांनी मार्ग काढण्याचं भारताचं आवाहन

युक्रेन आणि रशिया या देशांनी सद्यस्थितीत सुरू असलेल्या संघर्षावर मार्ग शोधला पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय देशांना केलं. युक्रेनच्या दौऱ्यात, शांतता प्रस्थापित करण्याच्या सर्व प्रयत्नांमध्ये भारत सक्रीय भूमिका निभावेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.   युक्रेनचे राष्ट्राअध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत भेटीदरम्यान मोदी यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. मोदी म्हणाले की, लोककेंद्रीत दृष्टीकोन ठेवून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांची सक्रीय योजना भारतानं आखली आ...

July 9, 2024 10:56 AM

युक्रेन आणि पोलंड यांच्यात द्विपक्षीय सुरक्षा करार

युक्रेन आणि पोलंड यांच्यात द्विपक्षीय सुरक्षा करार झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी वॉर्सामध्ये काल करारावर सह्या केल्या.   वॉशिंग्टनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजे नाटोच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. या कराराअंतर्गत पोलंड हवाई संरक्षण क्षेत्रात युक्रेनला सहकार्य करणार आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पुनर्बांधणीमध्येही पोलंड मदत करणार आहे.

June 26, 2024 8:19 PM

युक्रेनला अमेरिकेचं आर्थिक पाठबळ राहील तोपर्यंत रशिया- युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता नसल्याची रशियाच्या राजदूताची स्पष्टोक्ती

अमेरिका जोपर्यंत युक्रेनला युद्धासाठी आर्थिक पाठबळ देत राहील तोपर्यंत रशिया- युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता नाही, असं आज रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे विशेष राजदूत रॉडिऑन मिरोशनिक यांनी सांगितलं. ते मुंबईत रशियन हाऊस इथं तज्ञांशी आणि प्रसारमाध्यमांशी बोलत होते. युक्रेनला मदत करणं अमेरिकेनं थांबवलं तरच युद्धबंदी होऊन शांतता नांदेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

June 22, 2024 5:59 PM

रशियाचा युक्रेनमधे पॉवर ग्रीडवर जोरदार हल्ला

युक्रेनमधे लीव शहरातल्या वीज निर्मिती आणि पारेषणाच्या पॉवर ग्रीडवर रशियाने केलेल्या जबरदस्त हल्ल्यात दोन वीज कामगार जखमी झाले. युक्रेनच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं, की रशियाने  डागलेल्या१६ क्षेपणास्त्रांपैकी १२ आणि १३ ड्रोन युक्रेनच्या हवाई दलानं निकामी केली. युक्रेनमधल्या पायाभूत सुविधांवर रशियाने गेल्या ३ महिन्यात केलेला हा आठवा हल्ला होता.