August 10, 2024 2:01 PM

ब्राझीलमधल्या प्रवासी विमान कोसळून ६१ जणांचा मृत्यू

ब्राझीलमधल्या साओ पाऊलो शहराजवळ आज एक प्रवासी विमान कोसळून ६१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ब्राझीलच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या विमानात ५७ प्रवासी आणि चार कर्मचारी प्रवास करत होते. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांविषयी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनसीयो लुला डीसिल्वा यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

July 28, 2024 7:59 PM

दिल्लीत खाजगी शिकवणीच्या तळघरात पाणी साचल्यानं ३ जणांचा, तर वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

दिल्लीमधल्या एका खाजगी शिकवणीच्या तळघरात पाणी साचल्यानं तीन जणांचा, तर वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. हे चौघेही विद्यार्थी असून, तीघे जण नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होते. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.   येत्या मंगळवारपर्यंत या घटनांचा अहवाल सादर करावा असे आदेश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. या घटनांमधून संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाचं अक्षम्य दूर्लक्ष दिसून येत आहे, या घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई ...