August 11, 2024 8:14 PM

मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार – डॉ. एस. जयशंकर

मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार असून, दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्यानं पारंपारिक स्वरुपाच्या पलीकडे मजल मारली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांच्या हस्ते आज मालदीव इथल्या अड्डू रेक्लमेशन अँड अड्डू शोअर प्रोटेक्शन या सागरी भराव आणि संरक्षण प्रकल्पांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. मालदीवमधल्या लोकांच्या जीवनाच्या सर्व पैलूंना अनुसरून त्याचे लाभ मिळवून देण्यासाठीच्या उपाययोजना आखणे हे दोन्ही देशामधल्या परस्पर सहकार...

August 10, 2024 11:33 AM

डॉ एस जयशंकर यांनी मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मूसा जमीर यांच्यासमवेत पत्रकार परिषदेला संबोधित केले

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, मूसा जमीर यांनी काल मालेमध्ये समुदाय विकास प्रकल्पांचं उद्घाटन करत सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली. माले इथे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांच्याशी झालेली चर्चा फलदायी झाल्याचं जयशंकर यांनी एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या चर्चेत विकास भागीदारी, क्षमता निर्माण, द्विपक्षीय आणि प्रादेशिक सुरक्षा, व्यापार आणि डिजिटल सहकार्य या विषयांचा समावेश होता. यावेळी रस्त्यावरील दिवे, मानसिक आरोग्य, मुलांची वाचा सुधार उ...