July 25, 2024 12:38 PM

महिला क्रिकेटमधे आशिया चषक टी-२० स्पर्धेत उद्या भारतीय संघाचा सामना बांगलादेशसह होणार

महिला क्रिकेटमधे आशिया चषक टी-२० स्पर्धेत उद्या भारतीय संघाचा सामना बांगलादेशसह होणार आहे. दरम्यान, काल या स्पर्धेत झालेल्या श्रीलंका विरुद्ध थायलंड सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा विजय झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या थायलंडनं वीस षटकांत सात गडी गमावून ९३ धावा केल्या. हे लक्ष्य श्रीलंकेच्या संघाने अवघ्या ११ षटकांत पार करत थायलंडवर विजय मिळवला. उद्या श्रीलंकेचा सामना पाकिस्तानसोबत होईल. श्रीलंकेच्या दांबुला इथं हे दोन्ही सामने खेळवले जातील. 

July 24, 2024 2:58 PM

महिला आशिया टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यफेरीत दाखल

  महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं अ गटातल्या अंतिम सामन्यात नेपाळवर ८२ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत १७८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना नेपाळला २० षटकांत अवघ्या ९६ धावा करता आल्या. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा हिनं ४८ चेंडूत ८१ धावा केल्या. दयालन हेमलता हिनं शेफालीसह १२२ धावांची भागीदारी केली. गोलंदाजीत भारताकडून दीप्ती शर्मा हिनं तीन तर राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. शेफाली वर्मा हिला ...

July 1, 2024 7:38 PM

महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दहा गडी राखून विजय

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं आज दहा गडी राखून विजय मिळवला. आज चौथ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात आफ्रिकेनं सर्वबाद ३७३ धावा करून ३६ धावांची आघाडी घेतली होती. भारतानं हे आव्हान एकही गडी न गमावता पूर्ण केलं.  भारतानं पहिल्या डावात ६०३ धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारत डाव घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ २६६ धावात आटोपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने लॉरा वोलव...

July 1, 2024 1:14 PM

महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०५ धावांची आघाडी

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताकडे १०५ धावांची आघाडी आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २६६ धावांवर संपुष्टात आला असून, त्यांना फॉलो ऑन मिळाला. स्नेहा राणा हिनं ८ बळी घेऊन इतिहास घडवला, तर दीप्ती शर्मानं २ खेळाडू बाद केले. कालचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद २३२ धावा झाल्या होत्या.

June 20, 2024 9:07 AM

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बेंगळुरू येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा ४ धावांनी विजय

महिला क्रिकेटमध्ये काल बंगळुरु इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा चार धावांनी पराभव केला. भारतीय महिला संघानं प्रथम फलंदाजी करत ३२६ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ ३२१ धावात सर्वबाद झाला. या विजयासोबतच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.