August 24, 2024 10:15 AM

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाकडून मनाई

महाराष्ट्रात, बदलापूर इथं लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती; मात्र यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं काल एका सुनावणी याचिकेवर मनाई केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणी न्यायालयानं महाविकास आघाडीचे घटक पक्ष, राज्य सरकार आणि गृहविभागाला नोटीस बजावली असून त्यात न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

July 9, 2024 7:50 PM

views 1

सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आज मुंबईत सर्वपक्षीय मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. मात्र या प्रकरणी राज्य सरकारनं विरोधकांना विश्वासात न घेतल्यानं महाविकास आघाडी बैठकीला जाणार नाही. आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यांनी आंदोलनाला भेट देऊन काय चर्चा केली आहे हे राज्यातील जनतेला कळलं पाहिजे. राज्य शासनानं आरक्षणप्रश्नी त्यांची भूमिका सभागृहात स्पष्ट करावी, अशी मागणी विधानसभेत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

July 9, 2024 5:06 PM

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि मागण्यांचं निवेदन केलं सादर

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांविषयी निवेदन सादर केलं. विधानपरिषदेचं सभापती पद हे गेले अडीच वर्ष रिक्त आहे. विधान परिषदेच्या सभापती पदासारखं संवैधानिक पद रिक्त असणं लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीसाठी याच अधिवेशनात तारीख जाहीर करावी, अशी विनंती शिष्टमंडळानं केली.

June 15, 2024 7:12 PM

विधानसभा निवडणूक अधिक ताकदीनं लढवण्याची महाविकास आघाडीची घोषणा

महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटनांसह छोटे पक्ष मिळून आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित आणि अधिक ताकदीने लढणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले. धार्मिक ध्रुवीकरणाचा निवडणुकीत काहीही परिणाम झाला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. महाविकास आघाडीनं आज मुंबईत संयुक्त परिषद देऊन लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३० जागा निवडून दिल्याबद्दल राज्यातल्या मतदारांचे आभार मानले आहेत. मदत करणारे छोटे...