July 29, 2024 9:48 AM

कनिष्ठ गटाच्या हॉकी इंडिया विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांना उपविजेतेपद

छत्तीसगडमध्ये झालेल्या कनिष्ठ गटाच्या हॉकी इंडिया विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांना उपविजेतेपद मिळालं आहे. पुरुष गटात हॉकी मध्य प्रदेशकडून महाराष्ट्र हॉकी संघाचा 4-6 असा पराभव झाला; तर महिला गटात मध्यप्रदेश संघानेच पेनल्टी शूट आउटमध्ये महाराष्ट्रावर 4-2 अशी मात केली.

July 28, 2024 6:13 PM

गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला.    येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

July 3, 2024 8:20 PM

महाराष्ट्रात झिका विषाणू प्रकरण पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची मार्गदर्शक नियमावली जारी

महाराष्ट्रात काही ठिकाणी झिका विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं सर्व राज्यांना मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रात 2 जुलैपर्यंत पुण्यात सहा तर कोल्हापूर आणि संगमनेर इथं प्रत्येकी एक अशा एकूण आठ झिकासंक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांनी झिका विषाणू संसर्गासंदर्भात अधिक दक्षता बाळगावी असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत. विशेषतः झिका संक्रमित गर्भवती मातांची तपासणी आणि गर्भाच्या वाढीवर देखरेख ठेवावी आणि केंद...

June 22, 2024 2:47 PM

महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार – चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजप प्रदेश कोअर कमिटीची बैठक काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झाली. लोकसभा निवडणुकीत जिथेकमकुवत होतो, तिथे अधिक मेहनत करू असं बावनकुळे यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका, विधानपरिषद निवडणुका आणि महाराष्ट्रातले आरक्षण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.