August 24, 2024 1:27 PM

जगातले विकसित देश मंदी आणि महागाईचा सामना करत असताना भारत त्यामानाने सुस्थितीत आहे – मंत्री पियूष गोयल

जगातले विकसित देश मंदी आणि महागाईचा सामना करत असताना भारत त्यामानाने सुस्थितीत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी केलं. W.I.R.C अर्थात पश्चिम भारत प्रादेशिक कौन्सिलच्या ३८ व्या परिषदेत, ‘विकसित भारत : २०४७’ या विषयावर गोयल काल बोलत होते. भारताच्या वाढीचा दर सात टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे, भारत हे जगाचं आशास्थान असल्याचं गोयल म्हणाले. 

July 15, 2024 6:57 PM

घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर गेल्या महिन्यात ३.३६ टक्क्यांवर

देशात अन्नधान्य, विशेषतः भाज्या आणि उत्पादित वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे घाऊक बाजारपेठेतली महागाई वाढून जून महिन्यात ३ पूर्णांक ३६ शतांश टक्क्यांवर गेली आहे. यात सलग चौथ्या महिन्यात वाढ नोंदवण्यात आली. ही महागाई मे महिन्यात २ पूर्णांक ६१ शतांश टक्के इतकी होती.