August 24, 2024 7:20 PM

मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार

  आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११३ वा भाग आहे.  हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित होईल. newsonair.gov.in हे संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे यूट्यूब चॅनल, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आ...

July 1, 2024 1:20 PM

लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवलं – प्रधानमंत्री

लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे अकराव्या भागात ते काल बोलत होते. जगातली सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांनी निवडणूक यंत्रणा आणि मतदारांचं अभिनंदन केलं तसंच देशवासीयांचे आभार मानले. जगभरात भारतीय संस्कृती गौरवली जात असल्याचं सांगताना त्याबाबतची अनेक उदाहरणं प्रधानमंत्र्यांनी मन की बात या कार्यक्रमात दिली. दह...

June 27, 2024 7:56 PM

प्रधानमंत्री येत्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत आहेत. हा या कार्यक्रमाचा १११ वा, तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच भाग असेल. रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व केंद्र, एआयआर न्यूज हे संकेत स्थळ, आणि न्यूजऑनएआयआर या मोबाईल ॲपवरही हा कार्यक्रम ऐकता येईल. आकाशवाणी वृत्तविभाग, डीडीन्यूज, प्रधानमंत्री कार्यालय, तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनल्सवरही हा कार्यक्रम उपलब...