September 26, 2024 9:50 AM

आरक्षणाच्या मागणीसाठीचं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, ओबीसी उपोषणकर्त्यांचंही उपोषण मागे

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी काल उपोषण स्थगित केलं. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी यावेळी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथं नागरिकांनी काल कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं. दरम्यान, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील आमरण उपोषण ...

July 24, 2024 7:03 PM

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जालनाच्या आंतरवाली सराटी इथं गेल्या पाच दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. सरकारचा जीव ज्या खुर्चीत अडकला आहे, ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीला आम्ही लागणार आहोत, असं जरांगे यांनी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.

July 6, 2024 7:09 PM

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर राजकीय भूमिका घेण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊन शासनानं या समाजाबद्दलची आस्था दाखवून द्यावी अन्यथा आगामी काळात राजकीय भूमिका घेऊ, असा इशारा आज आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. हिंगोली शहरात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ही रॅली सुरू झाली.  यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.

June 14, 2024 8:45 AM

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण काल मागे घेतलं. सरकारी शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या शिष्टमंडळात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा समावेश होता. मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरेसंदर्भातली अंमलबजावणी करण्याची जरांगे यांची मागणी असून, सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा, या काळात मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल, असं आ...