August 27, 2024 8:09 PM

विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात भाजपातर्फे उद्या पश्चिम बंगाल बंद

कोलकाता शहराच्या काही भागांमध्ये आज आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यात संघर्ष झाला. पोलिसांनी लावलेले अडथळे तोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी, तसंच जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर, पाण्याचे फवारे आणि लाठीमार केला. परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आला आहे. आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पोलिसांन...

August 11, 2024 8:48 PM

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपुरात भाजपाच्या मध्य नागपूर कार्यकारीणीच्या बैठकीत बोलत होते. कार्यकर्ता जाती-धर्म-पंथानं मोठा होत नाही, तो कार्य आणि कर्तृत्वानं मोठा होतो. त्यामुळे जातीवादाचे समर्थन न करता आचरण चांगले ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कार्यकर्त्याच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक सुख-दुःखाशी नेत्यांनी समरस व्हावं. आपला नेता आपल्यासोबत उभा राहील असा...

August 11, 2024 7:25 PM

विरोधकांच्या अपप्रचारामुळे भाजपाच्या जागा घटल्या, पण जनाधार घटला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं मत

लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अपप्रचार केल्यानं भाजपाच्या जागा कमी आल्या, पण आपला जनाधार कमी झालेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अकोल्यात भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.  कुठल्याच बहिणीला लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. मात्र या  योजनेच्या यशाचा त्रास महाविकास आघाडीला होत आहे ते रोज लाडक्या बहिणीच्या संदर्भात खोटं बोलत आहेत असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारन...

July 25, 2024 3:48 PM

अभिजित गंगोपाध्याय यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा आक्षेप

लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान काल भाजपा सदस्य अभिजित गंगोपाध्याय यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं आज आक्षेप नोंदवला. सकाळी सदनाचं कामकाज सुरु झाल्यावर काँग्रेस आणि टीएमसीच्या सदस्यांनी गंगोपाध्याय यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करत हा मुद्दा उपस्थित केला. गंगोपाध्याय यांचं वक्तव्य अयोग्य असून ते सभागृहाच्या प्रतिष्ठे विरोधात असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले. गंगोपाध्याय यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल इशारा देण्यात आल्याचं सभापती ओम ब...

July 12, 2024 8:16 PM

विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी

विधान परिषदेच्या आज झालेल्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीच्या ३ पैकी २ उमेदवारांना विजय मिळवता आला.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणारे शेकापचे जयंत पाटील या निवडणुकीत पराभूत झाले. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी आज विधान सभेच्या सर्व २७४ आमदारांनी मतदान केले. त्यातून भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे विजयी झाले.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून...

July 1, 2024 8:05 PM

राज्यातल्या विधानपरिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाच्या पाच उमेदवारांची नावं जाहीर

राज्यातल्या विधानपरिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाने पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. या उमेदवारांच्या नावावर भाजपाच्या केंद्रिय निवडणूक समितीने शिक्कामोर्तब केलं आहे. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याचं काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.

June 29, 2024 6:14 PM

आगामी विधानसभा निवडणुका महायुतीच जिंकेल- आशीष शेलार

आगामी विधानसभा निवडणुका महायुतीच जिंकेल असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर शेलार बोलत होते. यात राज्य सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अभिनंदन ठराव झाला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व २८८ मतदार संघातल्या प्रचारासाठीचा कार्यक्रम १० जुलैपर्यंत ठरवणार असल्याचं ते म्हणाले. भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री ...