August 27, 2024 8:29 PM

 बिहारमधून उपेंद्र कुशवाह आणि मनन कुमार मिश्रा यांची बिनविरोध निवड

 बिहारमधून, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि भाजपा उमेदवार मनन कुमार मिश्रा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी कुशवाह आणि मिश्रा या दोघांचेचं उमेदवारी अर्ज आले होते. आज उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस होता. दोघांनीही अर्ज कायम ठेवल्यानं निकाल जाहीर करण्यात आला. कुशवाह हे राष्ट्रीय लोकमोर्चाचे अध्यक्ष असून, त्यांचा पक्ष भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी आहे.

August 27, 2024 8:17 PM

दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, आणि कच्छमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, आणि कच्छमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर गुजरात आणि दक्षिण राजस्थानत आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये  काही ठिकाणी उद्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, येत्या ३० तारखेपर्यंत गुजरात, आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीजवळ समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्यानं मच्छिमारांना समुद्राच्या न जाण्यचा सल्ला हवामान वि...

July 29, 2024 3:53 PM

बिहारमधल्या जाती आधारित आरक्षण रद्द करण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

बिहारमधल्या नोकऱ्या आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठीचं जाती आधारित ६५ टक्के आरक्षण रद्द करण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणात बिहार सरकारनं दाखल केलेल्या अपिलावर न्यायालयानं नोटीस बजावली असून यावर सप्टेंबर महिन्यात सुनावणी घेण्याचं मान्य केलं आहे.  मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी बिहारमधल्या नोकऱ्या आणि उच्च शिक्षण संस्थांमधलं आरक्षण ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढवणारी राज्य सरकारची अधिसूचना पाटणा उच्च न्यायालयानं...

July 25, 2024 11:22 AM

प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणं आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी बिहार विधानसभेत विधेयक मंजूर

बिहार राज्य विधानसभेनं प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणं, परीक्षांमधील गैरप्रकार आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी काल एक कठोर विधेयक मंजूर केलं. बिहार सार्वजनिक परीक्षा – गैरमार्ग प्रतिबंध विधेयक 2024 नुसार आता गंभीर प्रकरणांमध्ये 3 वर्षांवरून 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री विजय कुमार चौधरी यांनी हे विधेयक सादर केलं.