July 13, 2024 12:22 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची यादी जाहीर

ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या भारतीय खेळाडूंची यादी काल जाहीर झाली. पॅरिस इथं 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नेतृत्वाखालील भारतीय तुकडीत 28 खेळांडूंचा समावेश असणार आहे. यामध्ये 11 महिला आणि 17 पुरुष खेळाडू आहेत. यंदाच्या या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू हा 16 वर्षांचा तर सर्वांत ज्येष्ठ खेळाडू हा 47 वर्ष वयाचा आहे.

July 9, 2024 10:45 AM

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी नेमबाज गगन नारंग यांची पथकाचे प्रमुख म्हणून निवड

 भारतीय ऑलिंपिक संघटनेनं पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी नेमबाज गगन नारंग यांची पथकाचे प्रमुख म्हणून निवड केली आहे. २६ तारखेपासून या स्पर्धा सुरू होणार आहेत. मेरी कोम यांची या आधी पथकप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे असमर्थता व्यक्त केल्यामुळे आधी उपपथकप्रमुख म्हणून निवड झालेले नारंग आता पथकप्रमुख असतील. ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी काल ही घोषणा केली. उद्घाटन सोहळ्यात टेबल टेनिसपटू शरत कमल आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हे ध्वजधारक असतील, असंही उष...