July 28, 2024 7:45 PM

२०२४चा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि देशासाठी अमृत पिढी घडवणारा असल्याचं मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन

२०२४चा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि देशासाठी अमृत पिढी घडवणारा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा देशाच्या १४० कोटी जनतेला मिळणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केला. या अर्थसंकल्पात फक्त गरिबांचं नाही, तर शेतकरी, युवा आणि महिलांचंही हित साधलं जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

June 30, 2024 1:57 PM

चालू आर्थिक वर्षात भारताचं 800 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दीष्ट- पियुष गोयल

चालू आर्थिक वर्षात ८०० अब्ज डॉलर्स निर्यातीचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी काल मुंबईत सांगितलं. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात प्रक्रिया, तसंच निर्यातदार आणि बँकांना सहाय्य पुरवण्यासाठी असलेल्या एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पेटंट्स, डिझाइन्स आणि ट्रेडमार्कचे नियंत्रक आदी संस्थांच्या कामाचा आढावा गोयल यांनी सांताक्रूझ इथं एका बैठकीत घेतला.  तंबाखू उत्पादक शेतकरी आणि तंबाखू उद्योगाशी संबंधित इतरांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन गोयल यांनी ...