August 6, 2024 4:05 PM

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ८७ टक्के भरलं

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ८७ टक्के भरलं आहे. गंगापूर धरणातला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या यावेळेपेक्षा दोन टक्के जास्त असला तरी जिल्ह्यातल्या २४ जलाशयात मिळून ६१ पूर्णांक ६२ शतांश टक्के साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातल्या पालखेड धरणात ६६ टक्के आणि दारणा धरण समुहात ८६ टक्के इतका पाणीसाठा आहे. गिरणा धरणातही ७३ टक्के इतका पाणीसाठा आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जलसंपदा विभागानं पाण्याचा विसर्ग कमी केला असून सध्या गंगापूरमधून ४७० तर दारणा धरणातून ५ हजार ३५६ आणि नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून...

August 4, 2024 7:16 PM

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय देखील पूर्ण भरले

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' आज पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी पूर्णपणे भरला.  गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज मध्य वैतरणा तलावही पूर्ण भरला आहे. गेल्या काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात सातत्यानं होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्यानं  वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या  सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९पूर्णांक १० शतांश टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे.

July 8, 2024 4:39 PM

ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस अनियमित पाणी पुरवठा

भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम ठाणे महापालिकेच्या शुद्धीकरण केंद्रांच्या कामावर होऊन ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. पिसे आणि शहाड इथल्या शुद्धीकरण केंद्रांजवळच्या नदी पात्रात जमा झालेला गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, ९, १० आणि ११ जुलै रोजी अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.