July 13, 2024 9:15 PM

मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी

मुंबई, पुणे आणि आसपासच्या भागात आज सकाळपासून पाऊस सुरु असून मुंबईत पावसाने जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवरील काही गाड्या उशीराने धावत आहेत. हवामान विभागानं मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे.  पावसामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी सह अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं आहे. अंधेरी, मिलन सबवे आणि मालाड सबवे मध्ये पाणी साचल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुणे विभागात हलका ते मध्यम पाऊस सुरु असून उदयाही असाच पाऊस पडणार असून त्याम...

July 9, 2024 7:10 PM

मुंबईत पावसाची विश्रांती

राजधानी मुंबई आणि उपनगर क्षेत्रात पावसानं आज विश्रांती घेतली आहे.  रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या ३ दिवसांपासून  कोसळणाऱ्या पावसाचा जोर काल रात्रीपासून कमी झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी असला तरी पुढचे दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. रविवारी झालेल्या अतिवृष्टीत ७१ कुटुंब बाधित होऊन ३६६ जणांचं स्थलांतर करण्यात आलं.  माणगाव इथं नदीला आलेल्या पुरात एक व्यक्ती वाहून गेली असून त्यांचा शोध सुरू आहे. कुडाळ तालुक्यात पुरामुळे १५८ गावांतल्या ३३२ शेतकऱ्यांच्या भातशेतीचं नुक...

July 8, 2024 6:58 PM

राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस

राज्यात आज विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला.  कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. शहरात आज दुपारी पावसानं विश्रान्ती घेतली होती मात्र संध्याकाळी पुन्हा पाऊस सुरू झाला. परिणामी पंचगंगा नदीचं पात्र फुगलं आहे. राजाराम बंधारा ३० फुटांवर असून नदीची इशारा पातळी ३९ आहे. जिल्ह्यातील ५७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण ४३ टक्के भरलं आहे. कोल्हापूर बाजारभोगाव राजापूर राज्यमार्ग बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे ठाणे, वसई, महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग इथं एनडीआरएफची पथकं...

July 8, 2024 6:53 PM

मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने विविध पावलं उचलली आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं. मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. बैठकीला मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आदी उपस्थित होते.  मुंबई आणि उपनगरात कालपासून आज सकाळी सात वाजेपर्यंत ३०० मिलीमिटर ...

July 8, 2024 5:52 PM

सिंधुदुर्ग : मुंबई – गोवा महामार्गावरची पावशी इथली वाहतूक सुरळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून तब्बल १४ तासानंतर मुंबई - गोवा महामार्गावरची पावशी इथली वाहतूक सुरळीत झाली. काल या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ चं एक पथक आज सकाळी कुडाळमध्ये दाखल झालं आहे.  दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी आज पूरग्रस्त गावांना भेट दिली. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीत राणे यांनी प्रशासनाला दिल्या.  आमदार वैभव नाईक यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केल...

July 8, 2024 5:47 PM

मुंबई महापालिका आपत्ती नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबईसह राज्यातली पावसाची स्थिती पाहता नागरिकांपर्यंत मदत पोहचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून सर्व यंत्रणा २४ तास दक्ष असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात  पाऊस झाल्यानं  त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महापालिकेनं तयार केलेल्या साठण तलावामुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भा...

July 6, 2024 7:39 PM

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल मुसळधार पाऊस

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर याच कालावधीत सोसाट्याचा वारा वाहू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर बऱ्याच ठिकाणी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

July 3, 2024 7:07 PM

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

June 17, 2024 1:40 PM

२२ जूननंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

पुण्यासह राज्याच्या विविध भागातून नाहीसा झालेला मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून प्रामुख्यानं घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जूनच्या पहिल्या ८ दिवसात चांगल्या पद्धतीनं बरसलेला मोसमी पाऊस गेल्या आठवडाभरापासून नाहीसा झाला आहे. त्यामुळं शेतीची कामं देखील खोळंबलेली आहेत. राज्यातील अनेक मोठ्या धरणांनी तळ गाठला असून कोयना धरणातील वीज निर्मिती देखील बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागानं...

June 14, 2024 7:51 PM

राज्यातल्या सुमारे साडे बाराशे महसुली मंडळात चारा डेपो उभारायला राज्य सरकारची परवानगी

राज्यातल्या अनेक भागात पावसाचं आगमन झालं असलं तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही म्हणून १ हजार २४५ महसुली मंडळात चारा डेपो उभारायला शासनानं परवानगी दिली आहे. राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जनावरांचं पालन करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या राज्यात सुमारे ५१२ लाख मेट्रिक टन हिरवा चारा तर सुमारे १४४ लाख मेट्रिक ...