July 27, 2024 7:26 PM

यंदा आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या खजिन्यात ८ कोटी ३४ लाख रुपये जमा

यंदा आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या खजिन्यात ८ कोटी ३४ लाख रुपये जमा झाल्याची माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात झालेला समाधानकारक पाऊस, त्यामुळे उरकलेली शेतीची कामं यामुळे यंदा मोठ्या संख्येनं आषाढीसाठी आले होते. त्यामुळे देवाच्या तिजोरीत गेल्या वर्षीपेक्षा दोन कोटी रुपये जास्त जमा झाले आहेत.

July 16, 2024 7:22 PM

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उत्तररात्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते आज उत्तररात्री अडीचच्या सुमाराला श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाणार आहे. यानिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “समन्वय समिती” गठीत करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, तसंच सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत या समितीत सदस्य म्हणून क...