July 6, 2024 7:03 PM

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला आज अमरावती जिल्ह्यातल्या धऱणी तालुक्यात सुरुवात

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला आज अमरावती जिल्ह्यातल्या धऱणी तालुक्यात सुरुवात झाली. या अभियानात ज्या निकषांची पूर्तता करायची आहे त्यांची माहिती स्थानिक नागरिकांना या कार्यक्रमात देण्यात आली. शिक्षण, आरोग्य, कृषी, पोषण आहार या क्षेत्रांमध्ये शंभर टक्के परीपूर्णता साधण्याचं आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांना केलं.  

July 4, 2024 5:04 PM

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज नांदेड इथं सुरुवात

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज महाराष्ट्रातल्या नांदेड इथं सुरुवात होत आहे. तर धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, न...