July 23, 2024 8:24 PM

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यात २५ हजार गावं बारमाही रस्त्यांनी जोडली जाणार

पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार मदत देणार असून यावर्षी भांडवली खर्चासाठी ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकार करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. ही गुंतवणुक देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ३ पूर्णांक ४ दशांश टक्के असेल.   प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यात २५ हजार गावं बारमाही रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. पूर नियंत्रणासह बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी विविध सवलतींची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. ग्रामीण आणि शहर...

July 23, 2024 1:44 PM

अर्थसंकल्पात युवांसाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा

युवांसाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्यविकासाच्या दृष्टीने सरकारच्या पाच योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्या.   अर्थसंकल्पात युवांसाठी महत्त्वाच्या योजना :    नोकरीच्या सुरुवातीला आर्थिक सहाय्य, उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मिती, नोकरी देणाऱ्यांना आर्थिक सहाय्य, महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महिला-केंद्रित कौशल्यविकास, महिलांसाठी वसतिगृहं, तसंच पाळणाघरांची उभारणी इत्यांदीचा समावेश आहे.   कौशल्यविकासासाठी कर्जं, शैक्षणिक कर्जं या क्षेत्रातही सरकारनं नवीन योजना...

July 6, 2024 7:25 PM

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै पासून,२३ जुलै रोजी सादर होणार अर्थसंकल्प

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. १२ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रीजिजू यांनी दिली आहे. तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

June 23, 2024 10:12 AM

पोलाद, लोह आणि ॲल्युमिनियमपासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12 टक्के एकसमान जीएसटी दराची शिफारस

वस्तु आणि सेवा कर परिषदेनं पोलाद, लोह आणि ॲल्युमिनियमपासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12 टक्के वस्तु आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या एकसमान दराची शिफारस केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या ५३व्या वस्तु आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना, रेल्वे फलाट तिकिटं, विश्राम कक्ष आणि प्रतीक्षा कक्षाच्या सुविधांसाह भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा तसच बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांवर कोणताही जीएसटी लागणार नाही अशी घोषणा केली. विविध ...