September 24, 2024 4:58 PM

ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कामगार आणि शिक्षक संघटना नेते डॉ.शरद कळणावत यांचं निधन

यवतमाळ इथले ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कामगार आणि शिक्षक संघटना नेते डॉ. शरद कळणावत यांचं आज सकाळी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. शरद कळणावत यांनी नागपूर आणि अमरावती दोन्ही विद्यापीठांमध्ये कार्यकारी मंडळ आणि विद्वतसभा सदस्य, अधिष्ठाता, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या पार पडल्या. अमरावती विद्यापीठाची पहिली डॉक्टरेट त्यांना मिळाली होती. उच्च शिक्षण क्षेत्रातला राज्य शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला होता. नुटा या प्राध्यापक संघटनेचे आणि महाराष्ट्र प्राध्यापक संघटने...

August 10, 2024 8:36 PM

ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजारानं निधन

  ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० आणि ९०च्या दशकात त्यांनी रंगभूमीवर केलेल्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. प्रायोगिक रंगभूमीवरुन कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कदम यांनी टुरटूर या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण केलं. विच्छा माझ...