July 6, 2024 7:46 PM

वाहन उद्योग क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत भारतानं जपानला मागे टाकले आहे-मंत्री नितीन गडकरी

वाहन उद्योग क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत भारतानं जपानला मागे टाकले आहे. देशाच्या वाहन उद्योगाची उलाढाल ७ लाख कोटींवरून २० लाख कोटींवर पोहचली आहे. येत्या काळात ही उलाढाल ५० लाख कोटींवर पोहचविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपुरात एका कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यात सेमिकंडक्टरचा प्रकल्प यावा यासाठी काही कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात सांगितलं.

June 23, 2024 12:10 PM

उद्योग व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय आणि संवाद असणे आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक आणि शैक्षणिक ज्ञानातून निर्माण होणारे संशोधन आणि परिसरातील विकास हे परस्पर पूरक असायला हवे, उद्योग विकासाकरिता त्या क्षेत्रातील उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये समन्वय आणि संवाद असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलं. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे आयोजित भारतीय उद्योग महासंघाच्या विदर्भ शाखेद्वारे आयोजित ' विदर्भामध्ये शैक्षणिक धोरणाला चालना ' या विषयावरील कार्यक्रमा...