August 19, 2024 8:20 PM

नागपूरचं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात सामंजस्य करार

नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.   या करारानुसार मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा दिली जाईल. तसंच तिथल्या रुग्णालयांतील आरोग्य कर्मचारी, नर्सेस ना  प्रशिक्षणाची जबाबदारी या इन्स्टिट्युटला दिली आहे. या करारामुळे मह...

August 19, 2024 6:30 PM

नागपूरच्या सुप्रिया मसराम आणि शिवांश मसरामची इंडिया आणि आशिया रेकॉर्डस बुकमध्ये नोंद

नागपूरच्या सुप्रिया कुमार मसराम यांनी संविधानातली ७५ कलमं तोंडपाठ म्हणून दाखवण्याचा विक्रम केला आहे. त्यासाठी त्यांनी दहा मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता, पण त्यांनी अवघ्या ६ मिनिटं २१ सेकंदांत, उपस्थितांपुढे भराभर कलमं सांगून विक्रम केला. तर त्यांचा ११ वर्षांचा मुलगा शिवांशनं विज्ञानाच्या पुस्तकातल्या शंभर पानांवर अधोरेखित असलेले शब्द न पाहता उपस्थितांना अवघ्या ८ मिनिटं पाच सेकंदांत अचूक सांगितले.   एकाचवेळी निर्धारित वेळेच्या आधी आपापलं उद्दिष्ट गाठत या मायलेकांनी इंडिया आणि आशिया रेकॉर्डस...

August 11, 2024 8:48 PM

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपुरात भाजपाच्या मध्य नागपूर कार्यकारीणीच्या बैठकीत बोलत होते. कार्यकर्ता जाती-धर्म-पंथानं मोठा होत नाही, तो कार्य आणि कर्तृत्वानं मोठा होतो. त्यामुळे जातीवादाचे समर्थन न करता आचरण चांगले ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कार्यकर्त्याच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक सुख-दुःखाशी नेत्यांनी समरस व्हावं. आपला नेता आपल्यासोबत उभा राहील असा...

July 28, 2024 7:40 PM

प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रस्ते सुरक्षा संदर्भात जागृती करावी – मंत्री नितीन गडकरी

नागपूर जिल्ह्यातल्या अपघात प्रवण ठिकाणी सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रशासन, वाहतूक तसंच रस्ते बांधणी यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय राखणं आणि लोकसहभाग वाढवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. गडकरी हे आज नागपूर जिल्हा सुरक्षा समिती बैठकीत सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अपघात प्रवण ठिकाणी सुधारणा घडवून आणण्यासाठी सेव लाईफ फाउंडेशन तसंच इतर स्वयंसेवी संस्थांनी सुचवलेल्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत अशी सूचनाही त्या...

July 11, 2024 12:17 PM

नागपूरमधील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या माजी संचालकांसह दहा जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल

निविदा आणि खरेदी प्रक्रियेतल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयनं नागपूरमधील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे निरीच्या माजी संचालकांसह दहा जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, बिहार आणि दिल्लीत 17 ठिकाणी काल छापेही घालण्यात आले. निरीतील पाच सरकारी अधिकारी, तसंच नवी मुंबई, ठाणे, प्रभादेवी इथल्या तीन खासगी संस्थांमधल्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयनं ही कारवाई केली. सर्वसाधारण आर्थिक नियम डावलून या संस...

July 1, 2024 7:28 PM

नागपूरमधल्या दीक्षाभूमी स्तुपाजवळच्या भूमिगत पार्किंगच्या बांधकामाला तत्काळ स्थगिती

नागपूरमधल्या दीक्षाभूमी स्तुपाजवळच्या भूमिगत पार्किंगविरोधात आज आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केल्यानंतर या बांधकामाला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. दीक्षाभूमी सुधार आराखड्यावर काही आक्षेप असतील तर त्यावर सर्वांशी चर्चा करून आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं फडणवीस म्हणाले. दीक्षाभूमीच्या मुख्य स्तुपाला या पार्किंगमुळे धोका निर्माण होईल, असा आंदोलकांचा आक्षेप आहे. दीक्षाभूमीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि संघटनांमध्ये या आक्षेपांबाबत चर्चा...

June 13, 2024 7:27 PM

नागपुरात स्फोटक कंपनीत झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू, ३ जखमी

नागपुरात धामणी परिसरात स्फोटकांच्या कंपनीत झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. चामुंडा एक्स्प्लोझिव्ह कंपनीत दुपारी ही दुर्घटना घडली. पोलीस आणि स्थानिक बचाव पथक याठिकाणी मदत कार्य करत आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.