July 10, 2024 7:20 PM

नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असलेले बीएसएफ जवान कामेश कदम यांना कर्तव्यावर असताना वीरमरण

नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असलेले बीएसएफ जवान कामेश विठ्ठलराव कदम यांना काल हरयाणा इथं कर्तव्यावर असताना वीरमरण आलं. ते ४२ वर्षांचे होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  कदम यांचा पार्थिव देह आज रात्री विशेष विमानाने नांदेड इथं आणला जाईल आणि उद्या सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

July 3, 2024 7:31 PM

नांदेड जिल्ह्यात किनवट इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपूर्णता अभियानाचा प्रारंभ

नांदेड जिल्ह्यात किनवट इथं आज नीती आयोगाच्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपूर्णता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत सर्व निकष ऑगस्टअखेर पूर्ण केले जातील, असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातही जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर या तीन महिन्यात संपूर्णता अभियान राबवलं जाणार आहे त्याचं उद्घाटन उद्या परंडा येथे होत आहे या अभियानाविषयी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांन...