July 25, 2024 1:46 PM

विरोधकांनी जनादेशाचा अपमान केल्याची संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची टीका

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देशानं दिलेल्या जनादेशाचा अपमान केल्याची टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज केली. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. अर्थसंकल्पावर अर्थपूर्ण चर्चा अपेक्षित असून, काही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचल्याचं ते यावेळी म्हणाले. विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर कोणतंही भाष्य न करता, केवळ राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.

July 13, 2024 10:18 AM

जे पी नड्डा यांनी घेतला आयुष्यमान भारत डिजिटल अभियानाचा आढावा

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा आयुष्यमान भारत डिजिटल अभियानाचा आढावा घेतला. नड्डा म्हणाले कीं, या दोन्ही योजना आपापली उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 34 कोटीहीन अधिक आयुष्यमान कार्डाचं वाटप आणि 7 कोटी 35 लाखाहून अधिक रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची सुविधा पुरविण्यात आली असल्याचं त्यांनी नमूद केलं. अशाप्रकारे एक लाख कोट...

July 11, 2024 2:55 PM

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देशातल्या नामांकित अर्थतज्ज्ञांशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत देशातल्या नामांकित अर्थतज्ज्ञांशी संवाद साधत आहेत. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत ते या अर्थज्ज्ञांची मतं आणि सूचना जाणून घेत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि इतर सदस्यही या बैठकीत उपस्थित आहेत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलैला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे.

June 18, 2024 2:43 PM

अजित डोवाल यांची अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीवन यांच्यासोबत बैठक

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीवन यांच्यासोबत काल नवी दिल्लीत बैठक घेतली. यावेळी डोवाल आणि सुलीवन यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत चर्चा झाली. सह-उत्पादन, सह-विकास आणि संशोधन आणि विकासाच्या संधींवर लक्ष केंद्रित करण्याचं उद्दिष्ट असल्याचे अमेरिकेनं म्हटलं आहे. या बैठकीत समविचारी देशांसोबत समन्वय वाढवून तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची वचनबद्धता दोन्ही दे...

June 14, 2024 8:21 PM

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणार रॅकेट अटकेत

नवी दिल्लीतल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणार रॅकेट पकडलं असून त्यांच्याकडून २० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केली. याप्रकरणातील दोन मुख्य सुत्रधारांना अटक केली असून त्यातील एक नायजेरियाचा तर दुसरा आयवरी कोस्टचा असल्याचं विशेष पथकानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं. या दोघांकडून सुमारे सहा किलो मेथमफेटामाइन हा अंमली पदार्थ जप्त केल्याचंही पत्रकात नमूद केलं आहे. हे दोघेही बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य करत असल्याचं तपासातून पुढं आलं असू...