July 22, 2024 8:39 PM

धाराशिव इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शन

नव्या भारतीय फौजदारी कायद्यांची माहिती लोकांना व्हावी, यासाठी केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर आणि पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्या सयुंक्त विद्यमाने उद्यापासून धाराशिव इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शन आयोजित केलं आहे. या प्रदर्शनात नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, या कायद्यांमधली नवीन कलमं आणि त्यांची कार्यपद्धती, ई-एफ आय आर, योग्य वेळेत न्याय, तंत्रज्ञानाचा वापर, न्यायाधीशाशी संबधित तरतुदी, काही महत्वाच्या गुन्ह्यांसाठी शिक्षेत वाढ, तसंच आणि नवीन कायद्याविषयीचे गैरसमज आणि वस्तुस्थिती आदी विषया...

July 4, 2024 5:06 PM

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात प्रारंभ

नीती आयोग ४ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान संपूर्णता अभियान राबवणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, धाराशिव, पालघर, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा या अभियानात समावेश झाला आहे.यवतमाळ जिल्ह्या...

July 4, 2024 5:04 PM

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज नांदेड इथं सुरुवात

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज महाराष्ट्रातल्या नांदेड इथं सुरुवात होत आहे. तर धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, न...

July 1, 2024 6:42 PM

धाराशिव जिल्ह्यातल्या खरीप हंगामाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण

यंदा पावसानं जूनच्या पहिल्या आठवड्यातच हजेरी लावल्यामुळं धाराशिव जिल्ह्यातल्या खरीप हंगामाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी सोयाबीनच्या पिकासाठी सर्वाधिक क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या आहेत. पेरण्या करण्यात आलेल्या अन्य पिकांमध्ये मूग, उडीद, तूर, मका यांसारख्या पिकांचा समावेश आहे. गेल्या ४-५ दिवसात उघडीप दिलेल्या पावसानं काल पुन्हा हजेरी लावल्यामुळं उगवण्याच्या बेतात असलेल्या पिकांना जीवदान मिळालं असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.