August 1, 2024 8:49 AM

मराठवाड्यातल्या सिंचन योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मराठवाड्यातल्या सिंचनाच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार दिली जाणार नसून, जे प्रकल्प हाती घेतले आहेत त्यासाठी मान्यता आणि प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भातली आढावा बैठकही काल फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या...

July 4, 2024 9:27 AM

पुणे शहराला पाणी कमी पडू दिलं जाणार नाही-जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

पुणे शहराची वाढती लोकसंख्या, गावांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासन पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याकरता नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी काम करत आहे असं सांगून कुठल्याही परिस्थितीत पुणे शहराला पाणी कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. पुण्यात गळती होणाऱ्या 40 टक्के पाण्याची बचत समान पाणी वाटप योजनेच्या माध्यमातून केल्यावर 4 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सदस्य रविंद्र धंगेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीस ...

July 1, 2024 5:50 PM

राज्यात स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी या अधिवेशनात नवा कायदा मांडण्यात येणार

राज्यात स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी या अधिवेशनात नवा कायदा मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. सरकारने गेल्या अडीच वर्षात विक्रमी १ लाख ८ हजार नोकऱ्या दिल्या आहेत. या सर्व परीक्षा पारदर्शी पद्धतीने पार पडल्या असून लवकरच वर्ग क पदभरती राज्य लोकसेवा आयोगाकडे देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. नवे फौजदारी कायदे आजपासून लागू झाले असून त्या अनुषंगाने पोर्टल तयार करण्यात आलं आहे, असं फडणवीस म्हणाले. तसंच, हे कायदे केल्याबद्...

June 22, 2024 1:09 PM

विज्ञान भारती संघटनेचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात लोणी काळभोर इथल्या एमआयटी मध्ये होणार

विज्ञान विषयाबाबत जनजागृतीसाठी काम करणाऱ्या विज्ञान भारती या संघटनेचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन आज आणि उद्या पुण्यात लोणी काळभोर इथल्या एमआयटी मध्ये होणार आहे. विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि सीएस-आयआर-चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी ही माहिती दिली. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जीतेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ आदी मान्यवर या अधिवेशनाच्या विविध सत्रात सहभागी होणार आहेत.