July 29, 2024 1:28 PM
दिल्लीच्या ओल्ड राजिंदर नगर भागातल्या १३ नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रांना टाळं
दिल्लीच्या ओल्ड राजिंदर नगर भागातल्या १३ नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रांच्या तळघरांना दिल्ली महानगर पालिकेनं टाळं ठोकलं आहे. तळघरात सुरू असलेली तीन केंद्र बंद करण्यात आली असून राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली असून एकूण आरोपींची संख्या सात झाली आहे.