June 23, 2024 10:12 AM

पोलाद, लोह आणि ॲल्युमिनियमपासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12 टक्के एकसमान जीएसटी दराची शिफारस

वस्तु आणि सेवा कर परिषदेनं पोलाद, लोह आणि ॲल्युमिनियमपासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12 टक्के वस्तु आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या एकसमान दराची शिफारस केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या ५३व्या वस्तु आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना, रेल्वे फलाट तिकिटं, विश्राम कक्ष आणि प्रतीक्षा कक्षाच्या सुविधांसाह भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा तसच बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांवर कोणताही जीएसटी लागणार नाही अशी घोषणा केली. विविध ...

June 22, 2024 8:09 PM

बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्याचे प्रकार रोखण्यासाठी आधारसंलग्न बायोमेट्रीक आधारित यंत्रणा जीएसटीमध्ये राबवली जाणार

बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणारे प्रकार रोखण्यासाठी आधारसंलग्न बायोमेट्रीक आधारित यंत्रणा जीएसटीमध्ये राबवली जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या ५३ व्या  बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. गुजरात, पुद्दुचेरीमध्ये याची चाचणी झाली असून टप्प्याटप्प्याने देशभरात अंमलबजावणी होईल, असं त्या म्हणाल्या. रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट, प्रतीक्षा कक्ष यासारख्या सुविधांना जीएसटीतून वगळल्याचंही त्या म्हणाल्या.