June 18, 2024 11:49 AM

राज्यात विविध जिल्ह्यांत पोलिस विभागातल्या रिक्त पदांसाठी उद्यापासून भरती प्रक्रिया

राज्यात विविध जिल्ह्यांत पोलिस विभागात रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सुमारे साडे सातशे, परभणीत १४१ तर जालना पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या १०२ आणि चालक पदाच्या २३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होईल. या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नये, असं आवाहन जालन्याचं पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केलं आहे.

June 18, 2024 11:23 AM

बकरी ईदचा सण सर्वत्र भक्तिभावानं साजरा

बकरी ईदचा सण काल सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. पारंपरिक पद्धतीनं नमाज पठणासह इतर कुर्बानी आणि इतर धार्मिक विधी पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथं महापालिकेनं तीन ठिकाणी केलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्यात काल म्हैस तसंच बकरीवर्गीय सुमारे शंभर जनावरांची कुर्बानी देण्यात आल्याचं, महापालिकेकडून जारी पत्रकात म्हटलं आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बकरी ईद पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. लातूर शहरातल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आलं. त्यानंतर जगभरात शांततेसाठी सामुहिक प्रार्थना क...

June 18, 2024 8:45 AM

ओबीसी आरक्षण आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज राज्य मंत्रिमंडळासोबत बैठक

ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी, जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं उपोषणकर्त्या आंदोलकांच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळ आज राज्य मंत्रिमंडळासोबत बैठक होणार आहे. सरकार या शिष्टमंडळाशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल सकाळी या आंदोलकांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं लेखी आश्वासन सरकानं द्यावं, अशी मागणी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंड...