June 22, 2024 2:47 PM

महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार – चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजप प्रदेश कोअर कमिटीची बैठक काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झाली. लोकसभा निवडणुकीत जिथेकमकुवत होतो, तिथे अधिक मेहनत करू असं बावनकुळे यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका, विधानपरिषद निवडणुका आणि महाराष्ट्रातले आरक्षण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

June 14, 2024 7:17 PM

काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जनतेला खोटं बोलून मतं घेतल्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जनतेला संभ्रमित केलं, तसंच खोटं बोलून मतं घेतली, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. भाजपा संविधान बदलणार असल्याची काँग्रेसने जनतेच्या मनात निर्माण केलेली भिती आपण दूर करु आणि जनतेचा विश्वास संपादित करून विधानसभेची निवडणूक जिंकू, असं ते यावेळी म्हणाले.