July 4, 2024 12:49 PM

महाराष्ट्रात नव्यानं सहा ते सात हजार ग्रंथालयं सुरु होणार

महाराष्ट्रात  वाचन चळवळीला चालना देण्यासाठी  शासन अनुदानित सुमारे साडे अकरा हजार ग्रंथालयं असून नव्यानं सहा ते सात हजार ग्रंथालयं सुरु करण्यात येतील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अरुण लाड यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तासाच्या चर्चेला ते उत्तर देत होते.  यानुसार ३ हजार लोकसंख्येच्या प्रत्येक गावात तसंच ५०० लोकसंख्येच्या आदिवासी बहुल गावात ग्रंथालय अनिवार्य होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे...

July 1, 2024 5:46 PM

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाचा सर्वसमावेशक धोरण

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाने एक सर्वसमावेशक धोरण ठरवलं असून योग्य प्रक्रिया पूर्ण करून या अधिवेशनात याबाबतचा शासन निर्णय आणला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. २०१८ मध्ये आलेल्या दोन शासन निर्णयांद्वारे एकंदर ३३ खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. टी-...