August 27, 2024 7:16 PM

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. ...

August 27, 2024 3:48 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा विद्यापीठास समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मान्यता

कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा विद्यापीठाला समूह विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या समूह विद्यापीठात वारणानगर इथल्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, या महाविद्यालयासह यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, या महाविद्यालयांचा समावेश करून समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

July 23, 2024 8:43 AM

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी नदीनाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे आणि १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. काल सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. विदर्भात अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना काल सुट्टी जाहीर करण्यात...

July 13, 2024 1:49 PM

महाराष्ट्रात नगरपंचायत आणि एका नगर परिषदेतल्या मिळून 11 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होणार

महाराष्ट्रातल्या विविध नगरपंचायती, एका नगरपरिषदेतल्या सदस्य पदांच्या ११ रिक्त जागांसाठी, येत्या ११ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोल्हापूराच्या हातकणंगले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेची पोटनिवडणुकीही त्याच दिवशी घेतली जाईल असं आयोगानं कळवलं आहे. मतमोजणी १२ ऑगस्ट ला होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार २१ जुलै वगळून दिनांक १८ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत, तर २५ जुलै ला अर्जांची छाननी होणार असल्याचं आयोगाच्या...

June 18, 2024 3:54 PM

कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात मोर्चा

कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रास्तवित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मार्गासाठी संपादित करण्यात आलेली बहुतांश जमीन बागायती असून या महामार्गामुळे परिसरातल्या पर्यावरण आणि जैवविविधतेचा ऱ्हास होईल या कारणामुळे कोल्हापूरसह १२ जिल्ह्यातले शेतकरी याला विरोध करत आहेत.

June 14, 2024 3:23 PM

राजापूरमधील अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्याचं काम अद्याप सुरू

राजापूरला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात काल रात्री दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद झाला होता. दरड हटवण्यासाठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीच्या साह्याने ही दरड बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे. मोठे खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग मशीनदेखील घटनास्थळी मागवण्यात आलं आहे. या मार्गावरून आता एका बाजूने दुचाकी वाहनांची वाहतूक सावधगिरीनं सुरू करण्यात आली असून, मोठ्या वाहनांनी आंबा घाटाच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं...