June 27, 2024 6:39 PM
राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धार आणि निश्चयाचं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धार आणि निश्चयाचं आहे. गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलं आहे. मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते. निरोप कोण कुणाला देतो, हे येणारा काळच ठरवेल, असंही ते म्हणाले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान आमच्या सरकारनं दिलं. शेताच्या बांधावर जाणारं हे सरकार आहे. शेतकऱ्यांची दुःखं आम्हाला समजतात, असंही शिंदे यांनी नमूद केलं. ड्रग्ज प्रकरण...