August 27, 2024 7:25 PM

नेपाळ बस दुर्घटनेतल्या जखमींना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत सर्वतोपरी मदत करणार

नेपाळ बस दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना काल उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या मदतीने नेपाळहून मुंबईत आणण्यात आलं. यात भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव इथल्या एकूण ७ जखमी प्रवाशांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या जखमींची बॉम्बे रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. उद्या आणखी ४ जखमींना मुंबई आणण्यात येणार असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.

August 11, 2024 7:25 PM

विरोधकांच्या अपप्रचारामुळे भाजपाच्या जागा घटल्या, पण जनाधार घटला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं मत

लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अपप्रचार केल्यानं भाजपाच्या जागा कमी आल्या, पण आपला जनाधार कमी झालेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अकोल्यात भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.  कुठल्याच बहिणीला लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. मात्र या  योजनेच्या यशाचा त्रास महाविकास आघाडीला होत आहे ते रोज लाडक्या बहिणीच्या संदर्भात खोटं बोलत आहेत असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारन...

July 3, 2024 7:57 PM

राज्याची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून गुंतवणुकीच्या बाबतीतही राज्य अग्रेसर आहे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव आज विधानपरिषदेनं एकमताने मंजूर केला. तत्पूर्वी, या प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी उत्तर दिलं. राज्याची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून गुंतवणुकीच्या बाबतीतही राज्य अग्रेसर आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेनं अर्धा ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे आणि एक ट्रिलियन डॉलरचं ध्येय पुढच्या ३ ते ५ वर्षांत गाठण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शक आराखडा तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. महायुती सरकारनं नोकरभरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं र...