September 23, 2024 7:50 PM

महाराष्ट्रात ऊसाचा गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार

महाराष्ट्रात ऊसाचा गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयानं कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. दिवाळी सण, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून ही तारीख ठरवल्याचं त्यांनी सांगितलं.

September 19, 2024 4:47 PM

बुलढाणा शहरात २६ स्मारकांचं लोकार्पण

बुलडाणा इथं आज छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह बुलढाणा शहरात २६ स्मारकांचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत झालं. त्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.